Saturday, May 21, 2011

भक्त विचारी गणपतीला


तूझी भक्ती करून भक्त
तुझ्या उंदार प्रमाणेच वागत आहेत .
जिथे जिथे खायची संधी आहे ,
तिथे तिथे उंदीर लागत आहेत !! 
काळ्यान पेक्षा पांढरे उंदीर
सध्या जास्तच फार्मात आहेत !
या फळांची पाळ मूळ
मतदारांच्याच कर्मात आहेत !!  
गणराया ....तू म्हणे
करता करविता.
बुद्धीच्या नायका
तू म्हणे बुद्धिदाता !! 
माझ्या एका प्रश्नाचे
उत्तर सांग बाबा आता !
खुर्चीवरचे गणपती
बुद्धी मागायला आले तेव्हा
तू कुठे गेला होता ?

No comments:

Post a Comment