Saturday, April 30, 2011

तिचे पावसाळी आपत्ती व्यवस्थापन...... !!!!



तिला त्याच्या कोसळण्याचा
कधी अंदाजच येत नाही.
पण त्याच्या वादळाची शक्यता
कधी ती मनावर घेत नाही.

अंदाज नसताना सुद्धा तो ,
मुसळधार होवून कोसळतो.
तिच्या गाफीलपणा मुळेच  
तो लता होवून उसळतो.

तो मुसळधार तर  होताच
पण ती गडबडून जाते .
तिचे आपत्ती व्यवस्थापन आसे
मग बेभरवशाणे कोलमडून जाते

ती मग हतबल होत
अखेर त्याच्याशी शरण जाते !
अशा प्रकारे तीच्या आपत्तीच्या  
व्यवस्थापनाला त्याचे पावसाळी ग्रहण लागते

त्याचा सवेध घेण्यासाठी
ती बऱ्याच शाळा करत असते !
मनातल्या मनात मग नंतर
पावसाशी चाळा करत बसते !!

मग परत पाण्यात सूर्यबिंब
उगाच शोधत फिरत राहते !
का पुन्हा बरसेल तो असाच
या आठवणीत चिंब होत असते !!

पाऊस पडून गेल्यावर
मात्र ती उगाच हळहळ करते
उगाच त्याला कोसले हे काहूर
तिच्या मनामध्ये दाटते !!

Thursday, April 28, 2011

मैत्री म्हणजे .............. !!!

जेव्हा जीवाला शिवाला.
रंकाच रावाला,
भक्ताच देवाला,
न सांगताही कळल जाता
तेव्हाच मैत्रीच नातं
आपोआप जुळल जात.!

मैत्री मैत्री असते,
बाजारात विकत
मिळत नसते.
मैत्रीची किंमत पैशात
मोजता येत नसते !

मैत्री जन्माची  दात्री असते
मैत्री म्हणजे दोघांची खात्री असते.
मैत्री म्हणजे कधी हीची,
कधी त्याची.
पावसाळ्याच्या मोसमातील
असलेली एकच छत्री !

मैत्री म्हणजे
लुकलुकणारे चांदणे,
मैत्री म्हणजे हातावरचे गोंदण,
मैत्री म्हणजे
मन-मनातल्या तनाच
वेळोवेळी निंदन !

मैत्री नदीतला पारवा,
मैत्री रानामधला सरवा,
मैत्री कडक उन्हातला गारवा,
कधी पाव-मिसळीतला झण-झणीत शरवा !

राधेचा संगे असते ती मैत्री,
मीरेचा रंग असते ते मैत्री,
द्रौपदीचे न उलगडलेले
गुढ अंग असते ती मैत्री !

मुठभर सुदाम्याच्या पोह्या्त
कधीतरी गुंग असते ती मैत्री.
कधी कर्ण आणि दुर्योधनाच्या
प्रेमात दंग असते ती  मैत्री !

जेंव्हा आपलेच आपल्याला
अचानक दगा देतात.
तेव्हा मनाला आभाळा
एवढं बळ देते ती असते मैत्री...!!


Wednesday, April 27, 2011

सोशल नेटवर्किंग वरील प्रेम !!!



तरुणानो सोशल नेट वरील प्रेमाचा
बाबा काही भरवसा नसतो ! 
सुरुवात गोड असली तरी
शेवट मात्र ' फेक ' निघू शकतो !!

फेसबुक वर चाट करताना
कधी खरा चेहरा दाखवला जात नसतो
वरून कितीही इशारे केले तरी
प्रत्येक्षात भेटल्या शिवाय गुण दिसत नसतो !! 

सोशल नेटवर्कींगचे
अनुभव भले-बुरे असतात
नाव ‘फेसबुक’ असले तरी
सारेच चेहरे खरे नसतात !!

कुणी ट्विटर ग्रस्त आहेत
कुणी ओर्कुट ग्रस्त आहेत
या आभासी जगामध्ये
खरे चेहरेच त्रस्त आहेत !!

वरून-वरून जवळीक तरी
आतून ठराविक दुरावा आहे !
सोशल नेटवर्किंगच्या दुनियेत
याचा क्लिक क्लिक वर पुरावा आहे !!
म्हणूनच सोशल नेटवर्किंग
त्याला काही सोसले नाही !
तिच्या प्रेमात पडल्यावर
त्याला काहीसुद्धा दिसले नाही !!

तिच्या त्याच्या प्रकरणात
एक ग्यानबाची मेख होती !
तो जिच्या ‘नेट ‘ मध्ये अडकला
ती तर एक ‘फेक ‘ होती !!

Tuesday, April 26, 2011

लोकपाल विधेयकाचा बाऊ ------- !!!!




पैसे खाणे आणि पैसे देणे,
भ्रष्टाचार काही एव्हढाच नाही
वरवर दिसत असला तरी पण
भ्रष्टाचार काही तेव्हढाच नाहीय !! 

भ्रष्टाचाराचा अर्थ पाहिला तर
तसा खूप, खूपव्यापक आहे 
वाढत्या अनैतिकता हे
भ्रष्टाचारचे एक रूपक आहे !!

आता लोकपाल विधेयकाचा
बाऊ वटक्या दिग्गी पासून
फुटक्या आमऱ्या पर्यंत
सार्वजन करू लागले आहेत
लोकांचे गैरसमज वाढवायचे काम
सारे भाडखावू करू लागले आहेत !!.

निरंकु अशी सत्ता तर या
प्रत्येक भ्रष्टाला हवी आहे !!
ही भ्रष्टाचाराची आहार निती
आपल्याला सांगा कुठे नवी आहे ?

जशी जशी लोकपालची ताकद
भ्रष्टाचाऱ्यांनच्या लक्षात येवू लागली.
त्यांचा बेताल पणाच सांगतो
पळता भुईच थोडी होवू लागलीय !!

म्हणून लोकांच्या मना मध्ये
संशयाचे बीज पेरणे चालू आहे !
लोकपाल विधेयक समितीला
सगळे भ्रष्टाचारी मिळून घेरीत आहेत !!

लक्षात ठेवा अशा वेळी आपण सर्वानी
अण्णांन वर विश्वास दाखवला पाहिजे
भ्रष्टांनि कितीही विषारी फुत्कारले
तरी हेच एकदिवस लोकपालाच्या
पायावर लोटांगण घालणार आहेत !!

Friday, April 22, 2011

अण्णांनी दाखवून दिलय ........ !!!!





अण्णांनी दाखवून दिलय
दिल्ली आपण हादराउ शकतो.
भ्रष्टाच्यारी व्यवस्थेची
बिनापाण्याची सुद्धा भादरू शकतो.


आजच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला
हा पहिला- पहिलाच हादरा आहे !
आणि जिंकलेल्या या लढाईवर
लोकपालांची मुद्रा आहे !!

कुणालाच इथे वाटत नाही
आपले काही चुकल जातय.
त्या मुळेच जे पाहिजे ते
इथे दोन्ही तोंडाने विकले जाते

परंतु भ्रष्टाचारच्या विरूद्ध लढायचे असेल तर
लढणार्‍यांनी खाणेपिणे सोडले पाहिजे.
अण्णा नि केलेल्या कष्टाला जगला पाहिजे
स्वता निर्मळ होवूनच नंतर
या भानगडी मध्ये पडले पाहिजे !!

स्वत:निर्मळ झाल्या शिवाय
ही अवघड कामे होणार नाही !
नसता या लढ्यामधून बाजूला व्हा
लढा तरी कमीत कमी !!
बदनाम होणार नाही !!

Thursday, April 21, 2011

काका केंद्रात तर पुतण्या राज्यात........ !!!






काका केंद्रात ,पुतण्या राज्यात ,
घोटाळा करत असतो आन वर
जिल्हा परिषदेत कुणीतरी
पाहुणा बसलेला असतो
कुणी म्हणायला गेलेच तर
जणकल्याण हाच हेतू असतो 

उरलेल्या ठिकाणी तर कायदेशीर
लेकी सुना बसवील्या जातात !
लोकशाहीच्या वल्गना अशाप्रकारे
पद्धतशीर पसरवल्या जातात

षंढालाही चीड यावी
एवढे अतिरेक होत आहे.
काका आणि पुतण्याचे
जब्बर राजकारण वाढत आहेत

आता मात्र तेच उघडे पडलेले आहेत
जे जे पापं झाकणारे आहेत !
लोकांनाही दिसू लागलेय ,
कोण पांघरून टाकणारे आहेत

मनाची लज्जा, नैतिकता
यांना केव्हाचा टाटा आहे !
काका पुतण्याचा खेळ पहिले
की वाटते, केंद्रातला इटालियन
बाबा खरच किती छोटा आहे !

Wednesday, April 20, 2011

तरी माझा भारत महान --- !!!




कार्यकर्ते कमी झाले आणि
नेतेच फार झालेत,
भारत माते ,तुझ्या नावावर
खाणाऱ्यांची खातेच फार झाले !!

वाटणीला बसले ते
वाटला तुला पुरता त्यांनी,
सर्वांच्या डोळ्या देखत,
लुटला  भारत त्यांनी !!

चोर -गिधाडांचा
एकमेंकानकडे सारखा टेका असतो.
देशाच्या अर्थकारणाला
नेमका हाच धोका असतो

आम्ही कशास सांगावे ?
कोण लुच्चे आणि कोण लफंगे आहेत ?
स्वातंत्र्याच्या या दुसर्‍या लढाई,त
काळ्यामध्ये गोरेच लपले आहे !!.

स्वातंत्र्या नंतरच्या या पहिल्या लढाईत
 आसे फार काही अंतर नाही !!
लोक सहभागा शिवाय यश,
हे काही जंतर मधले मंतर नाही !!
 

तरीच अण्णा आम्ही तुम्हांला ------ हजारवेळा सांगितले !!!



गर्जा महाराष्ट्र माझा...
म्हण्याची खरीच इच्छा होते आहे,
आपल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनचे,
म्हणे स्विस बॅंके मध्ये खाते आहे !!

खरे काय ? खोटे काय ?चौकशी आंती सिद्ध होईल !
देशा-पार झेंडे लावण्याची,
खरोखरच आता मात्र हद्दच होईल !!

चौकशावरती चौकश्या,
साऱ्या चौकशांचे किस निघाले.
चारशे वर पांच अधिकारी,
चारसो बीस निघाले !!
चारशेपाच जणांचा 420 पणा,
हे तर हिमालयाचे टोकच आहे !
हे काही सांगायची गरज नाही
आमचा कशा कडॆ रोख आहे !!
तरीच अण्णा आम्ही तुम्हांला
हजार वेळा सांगितले,
तरी तुम्हांला पण आमचे
काय पटतच नाही !!

इथे जमले सारेच षंढ,
भ्रष्टाचारच्या नावाने इथे,
कुणाचे साधे डोके
सुद्धा उठत नाही !!
आता देव करो आणि,
तुम्हा आम्हांला एकच सदबुद्धी होवो !
राळेगणचा हा सिद्धीच,
तुमच्या आन आमच्या अंगात येवो !!