Friday, November 11, 2011
Friday, November 4, 2011
Saturday, October 29, 2011
Thursday, October 27, 2011
Friday, September 30, 2011
Wednesday, September 28, 2011
Friday, September 23, 2011
Wednesday, September 21, 2011
Friday, September 16, 2011
Monday, September 5, 2011
Wednesday, August 10, 2011
Monday, August 8, 2011
Friday, August 5, 2011
Tuesday, June 7, 2011
Monday, June 6, 2011
देवघर आणि माणूस ------- !!!
माणसांणच्या दूनियेत
देव बिचारे उपरे आहेत
देव आणि देवतांच्या नावाने
घरा-घरातील कोपरे आहेत !!
माणसांच्या घरा पेक्षा
देवघरे छोटे आहेत !
देवांला कोपरे दाखविणारे
मांणसेच खोटी आहेत !!
इथे सकाळ संध्यकाळ
चोवीसतास देवाला काहीतरी
मागणे हा धंदा आहे ,नाही मिळाले
मनासारखे तर वर भरपूर निंदा आहे !!
देवा सारखा देव सुद्धा इथे माणसांना
घाबरला आहे ,त्याला पडलेय कोडे
नाही पूर्ण केले यांचे काम तर नक्की
उद्या कोपरा सुद्धा यांच्याकडे गहान आहे !!
पावसाचे राजकारण ------ !!!
पावसाळ्यात बघा
कसा चमत्कार घडत असतो ?
शंकराच्या पिंडीवर पाणी घालताच
पाऊस पडत असतो .
पण अगदी वेळेवर येणार
तो पाऊस कसला आहे?
त्याच्या अशा लहरी पणामुळेच
तर शेतकरी प्रत्येकवेळी फसला आहे.
त्याला जमिनीवरील राजकारणाचा
वाणावर गुणही लागू लागला आहे !
लहरी अन मनमर्जी असणारा पाऊस
बदमाशांसारखा वागू लागला आहे !!
पाऊस पक्का विरोधी पक्ष
सरकारला नेहमी नंगा करतो.
नको तिथे पाणी सोडून
पाऊस हमखास दंगा करतो !!
आपत्ती व्यवस्थापन करूनही
हे संकट काही रोखता येत नाही .
अपुऱ्या कपड्यांनी कधी
सगळे अंग झाकता येत नाही.
Friday, June 3, 2011
दगाबाज पाऊस -------- !!!
जेव्हा रिकामे पळून जाते
शेतकऱ्याचे काळीज तेव्हा
ढगासारखे विरघळून जातात .
तो स्वप्न पेरतो ,
फक्त बी-बियाणे पेरलेले नसते .
पाऊस नशीब घेवून जातो
हाती काहीच उरलेले नसते.
पाऊस मिनरल वॉटर होतो ,
पाऊस पाण्याचा तानकर होतो
निसर्गाच्या नाटकाचा
पाऊस दगाबाज अंकुर असतो
Thursday, June 2, 2011
प्राचार्य पाहिजेत ----!!!
महाविद्यालयाच्या कहाणीमध्ये
आता नवीन ट्वीस्ट आहे .
पूर्णवेळ प्राचार्य नसणाऱ्यांची
आत्ता काळी यादी आहे !!
अपात्र आणि सोयीची माणसे
प्राचार्यपदी पेरल्या जातात .
प्राचार्य मिळत नाहीत
जाहीर बोंबा मारल्या जातात !!
शिक्षण सम्राटांचे कावे
पात्रता धारकांना ठावे असतात !
प्राचार्य कम गुलाम
संस्थाचालकांना हवे असतात !!
Monday, May 30, 2011
कॉपी मुक्त शाळा------- !!!
कॉपी मुक्त परीक्षेची
जिथे जिथे पाटी लागू शकते
त्या त्या शाळा-महाविद्यालयांच्या
प्रवेशाची कूपाटी लागू शकते !!
अश्या पाट्या लागल्याशिवाय
विद्यार्थ्याची भीड चेपायाची नाही !
विद्यार्थ्यापेक्षा संस्थाचालकांनाच
कोपीमुक्ती झेपायची नाही !!
हातांतून चांलालेला विदयार्थी
शिक्षकाना रोखता येत नाही
कालंपर्यंत जो माल विकला ,
तो आतां विकंता येत नाही !!
कॉपी मुक्तीच्या आगीत असे
शिक्षकानाही पोळावे लागतं आहे
पोर देता का पोरं ? म्हणीत
पालकामागे पळावे लागतं आहे !!
Saturday, May 28, 2011
घोटाळ्यांची चढाओढ .......... !!!
आमच्या पेक्षा तुमचा मोठा
आमच्या विरूद्ध बोलू नका.
आम्ही कमी भ्रष्ट तर तुम्ही जास्त
आमची पोलखोल करू नका.
भ्रष्टांवर भ्रष्टांचीच
अशी राजकीय मात आहे !
माय बाप जनता वेडी नाहीय
सगळे तिला माहीत आहे !!
घोटाळ्यावर घोटाळे करत असताना
घोटाळ्यानवर ही तुलना चालल्या आहेत.
रूचल्याच तरी पचणार नाहीत
अशा सुद्ध गोष्टी खाल्ल्या आहेत.
तेच आता उघडे पडले आहेत
जे जे पापं झाकणारे आहेत !
लोकानाही दिसू लागले
कोण किती खोलात आहेत !!
हा तर 2G राजाचा हादरा आहे --------- !!!
पराभवाचे ...समर्थनही
मोठ्या ठेक्यात असते .
आपल्याला जमले नाही की ,
लोकशाही धोक्यात असते .
पराभवाच्या समर्थनाची
ही सर्वसामन्य शैली आहे !
काल त्यांच्या हातात होती
आज त्यांच्या हातात थैली आहे
लोकसभेत ज्यांनी अडवले ते
आता विधानसभेत ही पडले आहेत,
किती पैशाची आमिष दाखवली तरी
मतदारांनी हात दाखवले आहे.
त्यांच्या 2 G राज्यात हे सर्व घडले आहे
हा पहिला नाही ,दुसरा नाही
हा तर 2G राजाचा हादरा आहे ,
दुखी माणसाच्या अंगावर
पांढरा सदरा आणि काळा चष्मा आहे ....
Wednesday, May 25, 2011
लाईव्ह, लाईव्ह, लाईव्ह,
लाईव्ह, लाईव्ह, लाईव्ह,
जीकडे तीकडे न्यूज लाईव्ह,
जीकडे तीकडे ’पिपली’ आहे.
गिधाडाणची नजर तर
शिकारींवर टपली आहे !!
"आम्हीच आधी,सर्वात प्रथम"
असे ढोल बडवले जातात ,
दाखवण्यासाठी काहीच नसेल तर
बातम्या सुद्धा घडविल्या जातात !!
न्यूज वाहीण्यांची जीवघेणी स्पर्धा
पूर्ण पत्रकारितेला लाजरे करते आहे !
आनंद तर साजरा करतेच परंतु
दुःख देखील साजरे करते आहे !!
Tuesday, May 24, 2011
भ्रष्टाचाराच्या द्रुष्ट चक्राने
आता भस्मासुराचे रूप धरिले आहे ,
सरकारी कचेऱ्या ,कार्यलया सोबत आता
संपूर्ण व्यवस्थेला जणू घेरले आहे !!
पैसे देणे किंवा पैसे घेणे
म्हणजे भ्रष्टाचार एवढाच नाहीये
वरवर फुलत असला तरी
भ्रष्टाचार काही तेवढाच नाहीये !!
भ्रष्टाचाराचा अर्थ तसा
भरपूर व्यापलेला आहे !
वाढत्या अनैतेकतेच्या
भ्रष्टाचार म्हणजे खरे रूपकं आहे !!
Saturday, May 21, 2011
भक्त विचारी गणपतीला
तूझी भक्ती करून भक्त
तुझ्या उंदार प्रमाणेच वागत आहेत .
जिथे जिथे खायची संधी आहे ,
तिथे तिथे उंदीर लागत आहेत !!
काळ्यान पेक्षा पांढरे उंदीर
सध्या जास्तच फार्मात आहेत !
या फळांची पाळ मूळ
मतदारांच्याच कर्मात आहेत !!
गणराया ....तू म्हणे
करता करविता.
बुद्धीच्या नायका
तू म्हणे बुद्धिदाता !!
माझ्या एका प्रश्नाचे
उत्तर सांग बाबा आता !
खुर्चीवरचे गणपती
बुद्धी मागायला आले तेव्हा
तू कुठे गेला होता ?
Subscribe to:
Posts (Atom)