Saturday, March 12, 2011

तिरंग्याचे आत्मकथन् ...........


 
इंग्रजांच्या गुलामीत तिरंगा
बराच काही शिकला होता  
राजगुरू ,भगतसिंगाच्या
बलिदानात सुद्धा बहरला होता

मात्र या झेंड्या च्या गर्दीत
तिरंगा गुदमरू लागला.
केवळ औपचारीक्ता म्हणून
जो तो सलाम करू लागला .

तिरंग्याचा सन्मान नाही
ती देशभक्ती आंधळी आहे !
तिरंग्याचा कचरा करते
ती देशभक्ती वेंधळी आहे !!


स्वतंत्र्य  मिळवायचे नाही
आयतेच आपल्या हाती आहे.
हुतात्म्याची उपकाराचे ओझे
जन्मजात आपल्या माथी आहे.

हुतात्म्याची संधी नाही
हुतात्म्याची जान ठेवू या !
स्वताचे तर असतेच असते
जरा तिरंग्याचे ही भान ठेवू या 

No comments:

Post a Comment