Thursday, March 31, 2011

अनियमित व्याख्या संसाराची ...... !!!



स्थिर सुखी संसार असण्याला
दोन गोष्टीची गरज असते
नवरा शहाणा तर नवरा  
बायको दिवाणी असली पाहिजे.

अनियमित व्याख्या संसाराची
अगदी सरळ साधी असते
नवरा दहशतवादी असेल तर
बायको नक्षलवादी असते.

तिथे जाणीव कुणाला हि नसते
वाटत दोघानाही एकच असते !
आपण न्यायासाठी लढतो आहोत !
एकटे आपणच मरतो आहोत .

इथे संसाराची जाणीव
होणारच कशी ?
जेव्हा अहंकार दोघांचा आड असतो ! 
दोघे सुद्धा एकच करत असतात
मिळून आपल्या स्वप्नाचे
मुडदे पाडत असतात  !!






२१ व्या शतकात सुद्धा
अबला अबला म्हणीत
तुला सतत हेटाळले जाते.
लेडीज फस्ट चे उपकार दाखवीत
तुला पुढे पुढे पिटाळले जाते !

पुरुषांच्या स्त्री दक्षिण्याला
तू नेहमीच भुलत आलीस.
स्वतःसाठी कधीच नाही
पुरुषासाठी तू फुलत आलीस !

लक्षात ठेव मानापेक्षाही
आत्मसन्मान मोठा असतो !
लेडीज फस्ट मध्येही
पुरुषत्वाचा तथा असतो !!

शेन,दगड आणि शिव्याशाप
ज्यांच्यासाठी तुम्ही सोसले
त्यांना अजून वडाचेच वेद आहे.
उपकाराची अपकाराने
अशी दरसाल फेड आहे.

शिकलेल्या बेईमानी निघाल्या,
अशिक्षितांवर राग नाही !
स्त्री-पुरुष सामानत आली
पण त्यात मेंदूचा भागच नाही !!

जशी स्त्री क्षणाची पत्नी,
अनंत काळाची माता असते.
तशी पुरुषाच्या चारित्र्याची
ती वस्तुनिष्ठ गाथा असते.

कोण कसा ?कोण कसा ?
स्त्रियांना चांगलाच ज्ञात असतो !
प्रत्येक चारित्र्यवान पुरुषामागे
एकाच स्त्रीचा हात असतो !!

म्हणूनच आम्ही दिसते ते बोलतो,
उगीच नावे ठेवत नाहीत !
चतुर्थीचा चंद्र पहिल्या शिवाय
अजूनही त्या जेवत नाहीत !!

Tuesday, March 29, 2011

कवितेचे लिखाण कुणाच्या............... बापाचा ठेका नाही !!





राजकारण असो की समाजकारण
धमक तुमच्यात असली पाहिजे
या धमक वर सुद्धा नशीब लिहणारी
सटवाईची नजर असली पाहिजे !!

F B वर एकाचे पाय दुसऱ्या
कडून ओढले जातात.  
बघता बघता विषयाचे   
कंबरडेच मोडले जातात !!

सोशल नेटवर्कींग मध्ये
सुद्धा राजकारण होतात .
आत लांडग्यानचे पिठ्ठे गुट
करून बसतात आणि मातीत ज्या
जन्मले त्यावर उलटतात !!

पण लक्षात असू द्या पाठीशी
गोंडफादर असला तरी
जोडीला नशीब असावे लागते.
नाही तर प्रत्यक्ष हिऱ्यालाही
मातीत धूळ खात बसावे लागते !! 

आपलीच तुती वाजवणाऱ्या
माणसाला उन्माद हा रसातळाला
 नेतो ,तर सरळ माणसाचा
 सोज्वळपण हा प्रसिद्धीकडे नेतो !!

खऱ्या व्यक्तीमत्वाला कुणाचा
धोका नाही ,वेळच सांगेल
कवितेचे लिखाण कुणाच्या
बापाचा ठेका नाही !!

कुणाच्या तक्रारीने आमचे
F B अकौंट बंद पडणार नाही !
पडले तरी दुसरे उघडायला
वेळ लागणार नाही !!

दुर्दैवी माणसे कधी बघत नाहीत ?
तुमच्यात किती धमक आहे ?
केवळ नाशीबामुळेच कोळश्याना
सुद्धा आज हिऱ्याची चमक आहे !!


Saturday, March 26, 2011

सात जन्माची जेल !!

जर मनात आमच्या पहिले
असते डोकावून तर दिसले
असते झेंडूचे फुल.
जर लावली नसती आमच्यावर
बैलाची पैज,तर झाली नसती,
सात जन्माची जेल !!
जर आमची या जन्मात
झाली ती फजिती झाली नसती .
तर आम्हीसुद्धा बायाकाप्रमाणे
वटसावित्रीची पूजा केली असती !!
या जन्माचे दिले सोडून
पुढच्या जन्मीचे बघितले जात आहे !
आमची परवानगी न् घेताच
सात जन्मासाठी मागितली जात आहे !!

Wednesday, March 23, 2011

अध्यात्माची गुटी ....... ???



आज काल अध्यात्माच्या

नावाने खूप संत झाले

कुणी बाबा तर कुणी
अण्णाच्या नावाने वाढले.

बुवाबाजीच्या अंगणात
आज ज्याचा त्याचा टापू आहे.
रोज नवा बाबा,
नवा – नवा बापू आहे.
मी मोठा की तू मोठा ?
याचे स्तोम तर फार आहे.
भक्तांच्या टोळ्या-टोळ्यात
जणू ग्यांगवार आहे ?

जुना भक्त नवा गुरु
उगवत्याला वंदन आहे.
आध्यात्माचे चंदन आहे.

गुरु बरोबर भक्तांना ही
आज अध्यात्माची नशा आहे.
वरून वरून कीर्तन
आतून मात्र तमाशा आहे.

बुवा तिथे बाय,
बाय तिथे बुवा आहे.
एकांतात गुरुची सेवा ,
एकांतात दुवा अये.

कीर्तांची बिदागी तर
विचारू नका किती आहे ?
अध्यात्मिक चंगळवादात
बिचारी भक्ती सती आहे.

घेणार्यांना गोड वाटते
देणार्यानाही गोड वाटते
जेव्हढी कीर्तनात गोडी वाटते.

याला धंदा म्हणा,
नाही तर लुटालुटी म्हणा
ही तर अध्यात्मिक खुटी आहे ,
जो-तो त्याच्या परीने
घडवतो ती बाळकडू ची
गुटी आहे  


Tuesday, March 22, 2011

तुकोबा, होवू नये तो भक्तीचा कळस झालाय............. !!





तुकोबा, होवू नये तो
भक्तीचा कळस झालाय.
ज्यांचा घडायला पाहिजे नवस,
त्यांचा  किळस आलाय.
कुणी आपल्या बडेजावत
भक्तांना चूर करतोय.
कुणी भोळ्या भक्तांचे
दुख इथे दूर करतोय.

कुणी लावतोय अंगारा,
कुणी भक्तांचे कान फुंकतोय .
कुणी अफू-गांजाच्या नशेत
मठा-मठात झिंगतोय.

काही म्हणा पण
तुकोबा,या भोंदू बाबंच्या  
पाठी एक काठी हाणा !!

कुणी झाले मांत्रिक,
कुणी झाले तांत्रिक,
कुणी पट्टीचा एक्टर आहे.
रोग्यांची संख्या वाढताच
कुणी चक्क डॉक्टर आहे

यांच्या या बालबुद्धीला
तुम्ही फक्त नाठी म्हणा.
तुकोबा,या भोंदू बाबंच्या  
पाठी एक काठी हाणा !!

अजूनही त्यांचा
पुन्हा तोच दावा आहे.
जसे काय ज्ञानं म्हणजे
यांच्या बापाचाच ठेवा आहे.

पंढरीच्या वाळवंटी
आम्ही नाचतो आहोत.
नवे-नवे अर्थ शोधात
गाथा पुन्हा वाचतो आहोत.

एक कौतुकाची थाप
आमच्याही पाठी हाणा.
तुकोबा,या भोंदू बाबंच्या  
पाठी एक काठी हाणा !!

इथे कुठेही लांग्याना जागा नसते --------------- !!




दोन वाघांच्या भांडणात
मुद्दा एकच मराठी असायला पाहिजे
घरच्या राजकीय भांडणात सुद्धा
मराठी बाणा जपायला पाहिजे.

दोन्ही ठरतील वा लोक घडवतील ! 
दोघांचीही शैली ठाकरी पाहिजे.
 मात्र एकमेकांना झापायचे सोडून
लबाड लांग्याना चोपायला पाहिजे.

शैली दोघांची ठाकरी असेल
वजनात मात्र खास कोणीतरी एक असेल
दोघाच्या वादात तिसरा यायला नको
हेव्या दाव्यात मूळ मुद्दा विसरायला नको.

मराठी माणसाच्या नावाखाली
वेगवेगळे हेतू आहेत
त्यांचे प्रबोधन कुणी करावे ?
ते तर प्रबोधनकारांचे नातू आहेत.

सेनापतींच्या बाळकडूमुळेच
हा मार्मिक सामना रंगतो आहे !
चित्र-विचित्र व्यंग पाहून
दोन्हीकडचा सैनिक खंगतो आहे.

महाराष्ट्राचा तो वाघ जुना आहे !
तरी जनतेसाठी तो खास आहे !
वाघ हा वाघच असतो बाहेच्याना
इथे कुठे आहेर असतो ?

एक शेर तर दुसरा सव्वा शेर !
हा वाद ढाण्या वाघांचा आहे.
म्हणून लांडग्यांनी दूर राहिले पाहिजे  
कारण वाघांच्या भांडणात !
इथे कुठेही लांग्याना जागा नसते !!  

Monday, March 21, 2011

असा हा बाटग्यानचा पाकीस्तान .................... !!!



जिथे भारताचा द्वेष करणे
हेच मुख्य राजकारण असते, समृद्धीचे
जिथे नामोनिशान नसते, जगाच्या
पाठीवरील जो ठरला सैतान.  
असा हा बाटग्यानचा पाकीस्तान.

जिथे व्हायचे भारता
विरोधी कारस्थान,
तिथे विश्वास,शांतता,माणुसकीची
रोज होत आहे दाणादाण.
पाकिस्तान पाकिस्तान राहिला नाही.
त्यांचे झाले आहे अतेरेकीस्तान.

पेरले तर ते उगवणारच होते.
ते ठरले अतिरेक्यांचे जन्मस्थान
त्यानीच त्यांचा घात केला.
त्यात अतिरेक्यंचा काय दोष होता ?
इतिहासात एकच ओळ असेल
इथे पाकिस्तान नावाचा देश होता !

नेते तिथे बुवा ................. !!!


राजकारण करत-करत 
बुवाबाजी होत असते ,नको त्या
बुवा बाबांचे साथ देत स्वार्थ साधत असते.
स्वार्था साठी राजकारणी
नको ते भास करीत आहेत.
धरू नये त्या बुवाचे
जाहीर पाय धरीत आहेत

बुवा तिथे नेते,
नेते तिथे बुवा असतो !
एकमेकांच्या भल्यासाठी
दोघांचाही दुवा असतो.


Saturday, March 19, 2011

मैत्री म्हणजे .............. !!!




जेव्हा जीवाला शिवाला.
रंकाच रावाला,
भक्ताच देवाला,
न सांगताही कळल जाता
तेव्हाच मैत्रीच नातं
आपोआप जुळल जात.!

मैत्री मैत्री असते,
बाजारात विकत
मिळत नसते.
मैत्रीची किंमत पैशात
मोजता येत नसते !

मैत्री जन्माची  दात्री असते
मैत्री म्हणजे दोघांची खात्री असते.
मैत्री म्हणजे कधी हीची,
कधी त्याची.
पावसाळ्याच्या मोसमातील
असलेली एकच छत्री !

मैत्री म्हणजे
लुकलुकणारे चांदणे,
मैत्री म्हणजे हातावरचे गोंदण,
मैत्री म्हणजे
मन-मनातल्या तनाच
वेळोवेळी निंदन !

मैत्री नदीतला पारवा,
मैत्री रानामधला सरवा,
मैत्री कडक उन्हातला गारवा,
कधी पाव-मिसळीतला झण-झणीत शरवा !

राधेचा संगे असते ती मैत्री,
मीरेचा रंग असते ते मैत्री,
द्रौपदीचे न उलगडलेले
गुढ अंग असते ती मैत्री !

मुठभर सुदाम्याच्या पोह्या्त
कधीतरी गुंग असते ती मैत्री.
कधी कर्ण आणि दुर्योधनाच्या
प्रेमात दंग असते ती  मैत्री !

जेंव्हा आपलेच आपल्याला
अचानक दगा देतात.
तेव्हा मनाला आभाळा
एवढं बळ देते ती असते मैत्री...!!