Monday, May 30, 2011

कॉपी मुक्त शाळा------- !!!



कॉपी मुक्त परीक्षेची
जिथे जिथे पाटी लागू शकते
त्या त्या शाळा-महाविद्यालयांच्या
प्रवेशाची कूपाटी लागू शकते !!

अश्या पाट्या लागल्याशिवाय
विद्यार्थ्याची भीड चेपायाची नाही !
विद्यार्थ्यापेक्षा संस्थाचालकांनाच
कोपीमुक्ती झेपायची नाही !!

हातांतून चांलालेला विदयार्थी
शिक्षकाना रोखता येत नाही
कालंपर्यंत जो माल विकला ,
तो आतां विकंता येत नाही !!

कॉपी मुक्तीच्या आगीत असे
शिक्षकानाही पोळावे लागतं आहे
पोर देता का पोरं ? म्हणीत
पालकामागे पळावे लागतं आहे !!

Saturday, May 28, 2011

घोटाळ्यांची चढाओढ .......... !!!


आमच्या पेक्षा तुमचा मोठा
आमच्या विरूद्ध बोलू नका.
आम्ही कमी भ्रष्ट तर तुम्ही जास्त
आमची पोलखोल करू नका. 


भ्रष्टांवर भ्रष्टांचीच
अशी राजकीय मात आहे !
माय बाप जनता वेडी नाहीय
सगळे तिला माहीत आहे !! 



घोटाळ्यावर घोटाळे करत असताना
घोटाळ्यानवर ही तुलना चालल्या आहेत.
रूचल्याच तरी पचणार नाहीत
अशा सुद्ध गोष्टी खाल्ल्या आहेत. 



तेच आता उघडे पडले आहेत
जे जे पापं झाकणारे आहेत !
लोकानाही दिसू लागले
कोण किती खोलात आहेत !!


हा तर 2G राजाचा हादरा आहे --------- !!!



पराभवाचे ...समर्थनही
मोठ्या ठेक्यात असते .
आपल्याला जमले नाही की ,
लोकशाही धोक्यात असते .

पराभवाच्या समर्थनाची
ही सर्वसामन्य शैली आहे !
काल त्यांच्या हातात होती
आज त्यांच्या हातात थैली आहे

लोकसभेत ज्यांनी अडवले ते
आता विधानसभेत ही पडले आहेत,
किती पैशाची आमिष दाखवली तरी
मतदारांनी हात दाखवले आहे.
त्यांच्या 2 G राज्यात हे सर्व घडले आहे

हा पहिला नाही ,दुसरा नाही
हा तर 2G राजाचा हादरा आहे ,
दुखी माणसाच्या अंगावर
पांढरा सदरा आणि काळा चष्मा आहे ....
 
 

Wednesday, May 25, 2011

लाईव्ह, लाईव्ह, लाईव्ह,


लाईव्ह, लाईव्ह, लाईव्ह,
जीकडे तीकडे न्यूज लाईव्ह,
जीकडे तीकडे पिपलीआहे.
गिधाडाणची नजर तर
शिकारींवर टपली आहे !!

"आम्हीच आधी,सर्वात प्रथम"
असे ढोल बडवले जातात ,
दाखवण्यासाठी काहीच नसेल तर
बातम्या सुद्धा घडविल्या जातात !!

न्यूज वाहीण्यांची जीवघेणी स्पर्धा
पूर्ण पत्रकारितेला लाजरे करते आहे !
आनंद तर साजरा करतेच परंतु
दुःख देखील साजरे करते आहे !!

Tuesday, May 24, 2011



भ्रष्टाचाराच्या द्रुष्ट चक्राने  
आता भस्मासुराचे रूप धरिले आहे ,
सरकारी कचेऱ्या ,कार्यलया सोबत आता
संपूर्ण व्यवस्थेला जणू घेरले आहे !!


पैसे देणे किंवा पैसे घेणे
म्हणजे भ्रष्टाचार एवढाच नाहीये
वरवर फुलत असला तरी
भ्रष्टाचार काही तेवढाच नाहीये !! 

भ्रष्टाचाराचा अर्थ तसा
भरपूर व्यापलेला आहे !
वाढत्या अनैतेकतेच्या
भ्रष्टाचार म्हणजे खरे रूपकं आहे !!

ओबामा बोलले मिशेलाला .....!!!!

तुझी माझी अदा बघून
बघ कसे वेडे झाले होते ?
तुला कळालेच असेल ,
इंग्रजांनी दीडशे वर्ष
कसे राज्य केले होते ? 


तुझ आहे तुजपाशी
हेच यांना कळालेले नाही !
म्हणून तर टीचभर शेजाऱ्यावरती
अजून उत्तर मिळालेले नाही !!

Saturday, May 21, 2011

भक्त विचारी गणपतीला


तूझी भक्ती करून भक्त
तुझ्या उंदार प्रमाणेच वागत आहेत .
जिथे जिथे खायची संधी आहे ,
तिथे तिथे उंदीर लागत आहेत !! 
काळ्यान पेक्षा पांढरे उंदीर
सध्या जास्तच फार्मात आहेत !
या फळांची पाळ मूळ
मतदारांच्याच कर्मात आहेत !!  
गणराया ....तू म्हणे
करता करविता.
बुद्धीच्या नायका
तू म्हणे बुद्धिदाता !! 
माझ्या एका प्रश्नाचे
उत्तर सांग बाबा आता !
खुर्चीवरचे गणपती
बुद्धी मागायला आले तेव्हा
तू कुठे गेला होता ?

Thursday, May 19, 2011

अमेरीकेची खेळी ............... !!!



अमेरिकने पाकिस्तानात घुसून
ओसामाला गाडले आहे ,
त्याचे कशाला एवढे वेड पाहिजे ?
खरेतर आशियात अमेरिकेला
हाक्काचे लौंचींग प्याड पाहिजे  
नाचता नाचता नाचविण्याची
रीत त्यानी पाळली आहे !
दहशतवादाचा निषेध करताना
पाकिस्तानची दाढी कुरवाळली आहे 

त्यानी आजमावून पहिले
कुणाला जवळ करता येईल ?
एकदा की पाय रोवली
मग ढवळाढवळ करता येईल !

पाकच्या सहिष्णुतेचा पार
बुरखा त्यानी तार तार केला आहे
हा पाकड्याना धक्का तर बसलाच आहे !
परंतु लाडका असल्यामुळेच
पाक अमेरिकेवर रुसला आहे !!  
ओबामांना आपल्या भूमिकेतून
हेच सुचवायचे आहे !
आम्हाला अमच्या तालावर
जगाला नाचवायचे आहे !!

Wednesday, May 18, 2011

कवितेची चोरी

कुणी चोरायची कुणाची कविता तर काय 
निदान केलेली चोरी खपवली तरी आली पाहिजे.
चोरांनी कविता चोरावी अशी की,
ती इतरांना पचली पाहिजे !!
मित्रानो चोरी ती चोरीच असते 
कधी ना कधी फुटलीच जाते,
उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट सुद्धा 
वाचक राजानाही पटली पाहिजे !!
इतर चोर्‍यांन प्रमाणेच,
कवितेच्या चोऱ्यापण पचत नसतात !
कारण कवींचे काळीज हालल्याशिवाय,
आणि हातात वही पेन घेतल्या शिवाय
कविता कधी सुचतच नसतात !!  
म्हणूनच म्हणतो की दुसऱ्याची
कविता चोरून कवित्व येत नसते
कारण कवितेतील लेखणी जरी
चोरली तरीपण कवीची विचारांची
शाई त्यात भरता येत नसते !!

Tuesday, May 17, 2011


समाजसेवा
*********
कुणी मार खातो आहे ,
कुणी लोकासाठी मारतो आहे
जीवाची बाजी लावून
कुणी समाजसेवा करतो आहे .

त्यांचे कौतक नका करू ,
पण जाणीव तरी व्हायला पाहिजे !
अशा बहाद्दुरांची पाठीशी
समाजाने उभे रहायला पाहिजे !!
************************************




वाचक ते ग्राहक
***********

काय द्यावे कसे द्यावे ?
पेपेरवाल्यांची कमाल आहे.
वाचकांनि वाचीत जावे,
त्यंची फुल टू धमाल आहे  

स्पर्धेच्या युगामध्ये
ग्रःकांचाच तहात असतो !
नव्या-नव्या बक्षीस योजनांचा
नेहमीच “परिपाठ “ असतो !!

Monday, May 16, 2011

भारत मातेची पुकार ----- दे धडक,बे धडक !!!!

दे धडक,बे धडक
कर चीराख,बे चीराख
मुळापासून सारे रान ,
बाटग्यानचा अतीरेकीस्तान
नाव ज्याचे पाकिस्तान  
कर धडाडी , घे अशी भरारी !
संगे तुझ्या जेव्हा फौज रणशूरांची
भरेल दहशत उरात त्यांच्या
रणगाड्यांची अन सुखोईची   
नकट्यान पासून धाकट्या
पर्यंत तू एकटा वेढलेला
चारी दिशांनी घेरलेला.
नकोस ठेवू अशा मित्र राष्ट्रांची
संधी साधू जात तयांची. 
उठ पार्था ,घे भरारी
उरात भरव तू हुडहुडी
साख पहा तू इस्राईलची,
ओबमाच्या, ओसामा ऑपरेशनची,  
साथ आसे ज्यांना नकट्यानची 
भीती नको आशा पाकड्यांनची
कर पुनवृती १९७१ आणि कारगीलची

आज तू जरी केले माफ तरी
इतिहास माफ करणार नाही !
काळांची कसोटीच अशी आहे की,
ही नौटंकी तुला पुरणार नाही !!
दहशतवादाचा हा बकासुर तुला
मात्र उद्या सोडणार नाही.

Wednesday, May 11, 2011

सत्य आणि जमान्याची रीत.......... !!!!

 
सत्य जिथे उभे राहते  तिथे,
असत्येचा नक्की कल्लोळ असतो.
सत्य जर रेटले गेलेच नाही तर
सत्यावर अनैतिकतेचा हल्ला असतो !! 
नैतिक हल्ले होऊनही
सत्य चीढत नाही, कुढत नाही !
एकवेळ सत्य बदनाम होते,
पण सत्य काही केल्या
सत्यता सोडत नाही !! 
लोकांशी जर इमानदारीने वागले,
तर लोक तुम्हांला हंसू लागतात !
लोकांशी बेइमानीने वागाल ,
लोक सहज फसवू लागतात !! 
याची ना खन्त ,ना नवल,
सगळेच कसे आक्रीतल्या प्रमाणे आहे !
चुकीची असली तरीही मित्राहो
शेवटी हीच जमान्याची लोकरीत आहे !!

Monday, May 9, 2011

एकत्मता आमच्यात अजुन शेष आहे.



मारुन मारुन मारनार किती?
हा सव्वाशे कोटीचा देश आहे.
तापुन सुलाखुन निघालो आम्ही
एकत्मता आमच्यात अजुन शेष आहे.

खंड जिंकल्याची नशा चढेल
पण हा क्षणभराचाभास आहे.
दीडशतक लढण्याचा आमच्या
पाठीशी गांधीजींचा इतिहास आहे.

लपुन छ्पुन लढणारी तुमची जात 
आणि औलाद तर पाकड्या भित्र्यांचीआहे.
दिसलेली जी तुमची झलक सगळ्यांना,
ती तर पिसाळलेल्या कुत्र्यांचीआहे.

कधी हिरवा,तर कधी गार
ही तुमची धार्मिक ढालअसते.
सांडले जातेजे रक्त
ते तर फक्त लालेलालच असते.

तसे तुमचे ना-पाकी इरादे तर
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत.
तिरंग्याची शपथ खातोय,
आम्ही उगाच कीत नाहीत.

नाक उचलुन बोलतोआम्ही
तुमच्या प्रमाणे नकटे नाहीत.
असेल सारे जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटेनाही.

आमच्या आंभंगतेच्या कथा
तुम्हांस कळून चुकल्याआहेत.
झाडा गोळ्या,फोडा बॉम्ब
त्या आमच्यासाठी टिकल्या आहेत.

हा गैरसमज बाळगू नका,
तुम्ही आम्हांला गुलाम करा!
तुम्ही सारे थकून भागून
आखेर तिरंग्याला सलाम कराल !!