Wednesday, May 11, 2011

सत्य आणि जमान्याची रीत.......... !!!!

 
सत्य जिथे उभे राहते  तिथे,
असत्येचा नक्की कल्लोळ असतो.
सत्य जर रेटले गेलेच नाही तर
सत्यावर अनैतिकतेचा हल्ला असतो !! 
नैतिक हल्ले होऊनही
सत्य चीढत नाही, कुढत नाही !
एकवेळ सत्य बदनाम होते,
पण सत्य काही केल्या
सत्यता सोडत नाही !! 
लोकांशी जर इमानदारीने वागले,
तर लोक तुम्हांला हंसू लागतात !
लोकांशी बेइमानीने वागाल ,
लोक सहज फसवू लागतात !! 
याची ना खन्त ,ना नवल,
सगळेच कसे आक्रीतल्या प्रमाणे आहे !
चुकीची असली तरीही मित्राहो
शेवटी हीच जमान्याची लोकरीत आहे !!

Monday, May 9, 2011

एकत्मता आमच्यात अजुन शेष आहे.



मारुन मारुन मारनार किती?
हा सव्वाशे कोटीचा देश आहे.
तापुन सुलाखुन निघालो आम्ही
एकत्मता आमच्यात अजुन शेष आहे.

खंड जिंकल्याची नशा चढेल
पण हा क्षणभराचाच भास आहे.
दीडशतक लढण्याचा आमच्या
पाठीशी गांधीजींचा इतिहास आहे.

लपुन छ्पुन लढणारी तुमची जात 
आणि औलाद तर पाकड्या भित्र्यांचीच आहे.
दिसलेली जी तुमची झलक सगळ्यांना,
ती तर पिसाळलेल्या कुत्र्यांचीच आहे.

कधी हिरवा,तर कधी गार
ही तुमची धार्मिक ढालच असते.
सांडले जातेय जे रक्त
ते तर फक्त लालेलालच असते.

तसे तुमचे ना-पाकी इरादे तर
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत.
तिरंग्याची शपथ खातोय,
आम्ही उगाच बकीत नाहीत.

नाक उचलुन बोलतोय आम्ही
तुमच्या प्रमाणे नकटे नाहीत.
असेल सारे जग पाठीशी आमच्याच
आम्ही काही एकटेच नाही.

आमच्या आंभंगतेच्या कथा
तुम्हांस कळून चुकल्याच आहेत.
झाडा गोळ्या,फोडा ‍बॉम्ब
त्या आमच्यासाठी टिकल्या आहेत.

हा गैरसमज बाळगू नका,
तुम्ही आम्हांला गुलाम कराल !
तुम्ही सारे थकून भागून
आखेर तिरंग्याला सलाम कराल !!

Thursday, May 5, 2011

दिल्ली असो नाही तर गल्ली.......... नवरा पंगतीला लागतो !!!!



महिला सबलीकरणाचा हेतू
तिथे तिथे नक्की मार खातो .
जिथे जिथे बायकोच्या जीवावर
नवराच सुभेदार होतो !! 
आरक्षणाला अंगठा दाखवीत
अगदी सही सही नक्कल असते !
वर परत शेरेबाजी !!
चुलीपुरतीच अक्कल असते !! 
सबलीकरण झाले तरी
नवरा संगतीला लागतो
दिल्ली असो नाही तर गल्ली
नवरा पंगतीला लागतो !! 
त्याच्याशिवाय तिचे
अजून पान हालत नाही !
हे कसले सबलीकरण ?
आज्ञेशिवाय मान हालत नाही !!

Tuesday, May 3, 2011

आणखी एका लांदेनचा मृत्यू .......................!!!



पाकिस्तानी बाटगे सदाच
आतंकवादाच्या राक्षसाला
रंगा मध्ये रंगवायला लागले.
आपआपल्या सोईचे रंग वापरून
साऱ्या दुनीयेला भिंगवायला लागले !! 
लपून लपून लपला कुठे
माशी सुद्धा फिरकणार नाही जिथे,
हा पाकिस्तानी बाटग्यानचा डाव,
अमेरिकेने ताडला,नाकावर
टिच्चून पकड्यांच्या,ISI चा
एजेंट आखेर त्यानी गाडला !!   
लपाछपींच्या खेळात अखेर
लपणारा हाच हारला गेलाय.
ओसामा बीन लांदेन
परत एकदाचा मारला गेलाय !! 
लादेनच्या मृत्यू बरोबरच
आणखी एक गोष्ट चांगली झाली !
पाकिस्तानि बाटग्यांची हरामखोरी
परत एकदा वेशीवर टांगली गेली !!  
आता तरी पाकड्यांना उमजले पाहिजे
आपले काय  आणि परके काय
दहशतवादि काही पाळीत नसतो.
दया-मायेचा प्रश्न तर बेमानीच
दहशतवाद्यांच्या टोळीत कधीच नसतो!! 
आपल्या अस्त्तित्त्व टिकवण्यासाठी
ते काहीही धाडस करू शकतात !
परक्यानाच काय पण
आपल्याना सुद्धा मारू शकतात !!

Monday, May 2, 2011

ओबामाची माशीगीरी ................ !!!




ओबामांच्या भेटीचा
भारीच गाजावाजा होता?
त्यातून हाच संदेश मिळतो
की तोच जगाचा राजा होता.

ते म्हणाले तुम्ही आर्थिक
महासत्ता बनला आहात
आम्ही मोजीत बसलो होतो
अजून भेटीचा खर्च किती आहे ?

जगाचा राजा असला तरी
त्याला मात्र जीवाची गोची आहे !
जीवाच्या आकांताने त्याने
एक गोची केली ,चांगली धट्टी  
कट्टी माशी त्याने धराशायी पाडली  !!

मारून मारून काय तर म्हणे ?
ओबामानि एक माशी मारली
हे मात्र विचारू नका की ,
ती ब्रेकींग न्यूज कशी झाली? 

कोणी म्हणे स्वयराचार स्वातंत्र्यावर
ही केवढी मोठी गदा होती !
तर कोणी म्हणे ही तर ओसामा
बीनची नवी ट्रिक तर नव्हती ?

मरणाऱ्या पेक्षा मारणारा
इथे महत्त्वाचा ठरवला गेला !
एका माशीराणीचा मरण सोहळा
सार्‍या जगात फ़िरवला गेला !!