Tuesday, June 7, 2011
Monday, June 6, 2011
देवघर आणि माणूस ------- !!!
माणसांणच्या दूनियेत
देव बिचारे उपरे आहेत
देव आणि देवतांच्या नावाने
घरा-घरातील कोपरे आहेत !!
माणसांच्या घरा पेक्षा
देवघरे छोटे आहेत !
देवांला कोपरे दाखविणारे
मांणसेच खोटी आहेत !!
इथे सकाळ संध्यकाळ
चोवीसतास देवाला काहीतरी
मागणे हा धंदा आहे ,नाही मिळाले
मनासारखे तर वर भरपूर निंदा आहे !!
देवा सारखा देव सुद्धा इथे माणसांना
घाबरला आहे ,त्याला पडलेय कोडे
नाही पूर्ण केले यांचे काम तर नक्की
उद्या कोपरा सुद्धा यांच्याकडे गहान आहे !!
पावसाचे राजकारण ------ !!!
पावसाळ्यात बघा
कसा चमत्कार घडत असतो ?
शंकराच्या पिंडीवर पाणी घालताच
पाऊस पडत असतो .
पण अगदी वेळेवर येणार
तो पाऊस कसला आहे?
त्याच्या अशा लहरी पणामुळेच
तर शेतकरी प्रत्येकवेळी फसला आहे.
त्याला जमिनीवरील राजकारणाचा
वाणावर गुणही लागू लागला आहे !
लहरी अन मनमर्जी असणारा पाऊस
बदमाशांसारखा वागू लागला आहे !!
पाऊस पक्का विरोधी पक्ष
सरकारला नेहमी नंगा करतो.
नको तिथे पाणी सोडून
पाऊस हमखास दंगा करतो !!
आपत्ती व्यवस्थापन करूनही
हे संकट काही रोखता येत नाही .
अपुऱ्या कपड्यांनी कधी
सगळे अंग झाकता येत नाही.
Friday, June 3, 2011
दगाबाज पाऊस -------- !!!
जेव्हा रिकामे पळून जाते
शेतकऱ्याचे काळीज तेव्हा
ढगासारखे विरघळून जातात .
तो स्वप्न पेरतो ,
फक्त बी-बियाणे पेरलेले नसते .
पाऊस नशीब घेवून जातो
हाती काहीच उरलेले नसते.
पाऊस मिनरल वॉटर होतो ,
पाऊस पाण्याचा तानकर होतो
निसर्गाच्या नाटकाचा
पाऊस दगाबाज अंकुर असतो
Thursday, June 2, 2011
प्राचार्य पाहिजेत ----!!!
महाविद्यालयाच्या कहाणीमध्ये
आता नवीन ट्वीस्ट आहे .
पूर्णवेळ प्राचार्य नसणाऱ्यांची
आत्ता काळी यादी आहे !!
अपात्र आणि सोयीची माणसे
प्राचार्यपदी पेरल्या जातात .
प्राचार्य मिळत नाहीत
जाहीर बोंबा मारल्या जातात !!
शिक्षण सम्राटांचे कावे
पात्रता धारकांना ठावे असतात !
प्राचार्य कम गुलाम
संस्थाचालकांना हवे असतात !!
Subscribe to:
Posts (Atom)